लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

रसास्वाद....

मळलेल्या वाटा सोडून काही 'हटके' करणं भन्नाट जरी असलं तरी अस हटके करण्याचीही एखादी हटके पध्दत काही हुन्नरी माणस शोधतातं किंवा आपसुक त्यांना ती त-हा गवसते. औरंगाबादचे कवी श्रि. "रमेश ठोंबरे" या अश्याच एका 'हटके' माणसाचं 'प्रियेचे अभंग' हे असचं एक हटके पुस्तक वाचणात आलं आणि आईशप्पथ मजा आली. विशेष म्हणजे अभंगासारख्या पवित्रतम् छंदप्रकाराला कुठेही किंचीतसुध्दा गालबोट न लावता त्यांनी हे प्रियेचे तुफान अभंग रचलेतं.तसं हे पुस्तकं म्हणजे 'एकटेने वाचनेकी चिज नैच है.' मस्त चारसहा रसिकमित्र जमवावेत अन् उत्तेजक पेय( जसे चहा काँफी वगैरे) घेत घेत मैफिल जमवावी असं हे पुस्तकं. रमेशजी त्यांच्या 'कंपूत' महाराज या नावाने प्रसिध्द आहेत कारणं त्यांचे हे प्रियेचे अभंग.
आणि त्यांची प्रिया म्हणजे…
'सोन्याहुन सोनसळी
फुलाहुन गोड कळी
कधी अफुचीच
गोळी प्रिया माझी'
त्यांच्या या 'अफुच्या गोळीने' वाचक चांगलाच झिंगतो.. प्रांजळपणा या पुस्तकाच्या पानोपानी दिसतो..
'अभंगात माझ्या
प्रियेचीच भक्ती
प्रिया हिच शक्ती
मजसाठी.'
" उगीच ताक को जाके मडकं लपवनेका परकार" कविने कुठचं केला नाही म्हणुन तो परमेश्वराला स्पष्ट म्हणतो
'माफ कर देवा
माझा भक्ती होरा
आहे जरा न्यारा
जगाहुन.'
अहो प्रेम जर जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट असेल तर प्रियेला ईश्वर मानुन तिची आराधना करण्यात गैर ते काय? कविची प्रियाच नाही तर तिचा आरसासुध्दा ईथे भावं खातो कधी आपल्याला प्रियेला बिलगण्या आतुर झालेला 'उपाशी' पाऊस भेटतो तर कधी चावट चंद्रसुध्दा.
'प्रियेवर चंद्र
पुरताच फिदा
देखे सदा कदा
प्रियतमा'
पुढे या चंद्राचे लोचे बघा……।
'आजही करीतो
वेगळाच लोचा
छतावरी तिच्या
रेंगाळतो.'
"परी तो खट्याळ
लोचटही फार
प्रियेचे उभार
न्याहाळतो.'
प्रिया काँलेजात असतांना वर्गात रुक्ष गणितांच्या सरांकडे लक्ष कसं असणारं? मग…
'भिंगातून पाहे
सर तो खडूस
फेके तो 'खडू'स
माझ्याकडे.'
या 'खडूस' वर "अगं माय माय माय असा हेल काढके दाद देणेकुं दिल करत्या."
'प्रियेचा भक्त विव्हळ, आर्त वगैरे असणंही स्वाभाविकच. आणि केवळ स्वप्नातचं भेटं देणा-या प्रियेला तो निक्षून म्हणतो…
'संपणार कधी
स्वप्नांचा हा खेळ
काढ आता वेळ
सत्यातही'.
आणि एव्हढं करुनही जर तिने घेतलीच शंका तर हा 'जिगरबाज' कवी म्हणतो
'घेतलीत शंका
दाखविल 'तिस'
फाडून छातीस
आज येथे.'
ईसको बोलते जिगरा.!!
एखादा कवि असेल तो फार फार तर काय करेल त्याच्या प्रियेवर कविता करेलं.. पण हा कवि "मोठ्या उमद्या मनाचा अन् उदात्त विचारांचा धनी "कारण प्रियेच्या अख्ख्या कुटूंबावरच त्याने अभंग रचलेतं..
त्यांच्या प्रियेचा बाप….
'अंगी तो धिप्पाड
झोकात चालतो
नाकात बोलतो
काही बाही.'
तिचा भाऊ तर याहुन नगं……
'प्रियेचा तो बंधू
गुत्त्यावर दिस्तो
झिंगलेला अस्तो
रात्रं दिनी.'
तिची आई म्हणजे सौंर्द्याची खाणं आहे पण बहिण म्हणजे...
'वाढलेला घेर
कर्दमाचा गोळा
रुपावर बोळा
फिरविला.'
नाकावरची माशीही न उठणा-या खतरुड माणसांनाही ह्या ओळी हसवू शकतात अस मी येथे "प्रतिज्ञापुर्वक" नमूद करु ईच्छितो.
नंतर प्रियेचे (पटणं) भेटणं. आणि मग तिच्यासवे गुडूप तिमिरात ते "चलचिञ" (जे सहसा कुणीच बघतं नाहीत आणि जे अश्यावेळी फक्त चित्रपट बघतात त्याचं फार दिवसं टिकतं नाही असा सर्व्हे झाला होता म्हणे बा.)
'थेटरात जेव्हा
अंधार हा दाटे
प्रिया मग भेटे
बिलगुनी."
लैच गुदगुल्या करतात ह्या ओळी. पण प्रियेचा नखरा चितारतांना कवि लिहुन जातो..
'पाहून टाळणे
टाळून भाळणे
सर्वांग जाळणे
सावजाचे..'
ढोबळ मानाने चार विभागात हा संग्रह आहे.
1. पुर्वार्ध.
लाईन मारण्याचा टाईम पिरेड.
2.उत्तरार्ध
ती पटल्यानंतरचा पिरेडं.
3. प्रिया भक्तिसारं.
नवभक्तासाठी हा अतिशय महत्वाचा भाग आहे कारण ह्यात प्रियेला पटविण्याचे विविध गुरुमंत्र दिलेले आहेतं.
4. प्रियेचे श्लोक.
भुजंगप्रयातातल्या या अविट गोडिच्या अभंगाना खरचं तोड नाही.
पुस्तकं जेव्हढं हलक फुलकं आहे तेव्हढंच दर्जेदार झालयं. एकिकडे, आर्तता ,उत्कटता आणि विरहातली विव्हळता आहे तर दुसरी कडे 'ठो ठो' हास्यतुषार आहेतं. पण सगळा परिणाम केवळ AWESOME.. शिवाय सगळकाही छंदात त्यामुळे नाद, आणि लय आपसुक जपल्या जातेचं. एकदंरीत हे प्रियाबंबाळ पुस्तक वाचकाला "कुछ हटके वाच्या रे"चं निर्भेळ समाधान नक्किच देतं. रमेशदांच्या प्रयोगशिलतेला दंडवतं. आणि या आगळ्यावेगळ्या कलाकृतीबद्दल लक्षलक्ष धन्यवादं. शेवटी 'महारज' साहेबांची "माफी मांग" के त्यांच्याच स्टायलीत त्यांना ही मानवंदना.

खुप झाले येथे
संत आणि कवी
प्रियेवर ओवी
कोणी केली?
उघडा पुस्तक
प्रियेचे अभंग
वाचुनिया दंग
व्हाल तुम्ही.
एकदा वाचावी
'रमेशाची' प्रिया
व्हावे हसुनिया
लोटपोटं.
म्हाराज म्हणती
आदराने सारे
मर्म याचे खरे
उमगले.
प्रियेचे अभंग
रमेश ठोंबरे
माणूस बाप रे!!
अफाटचं.
महेंद्र गौतमं.
९४०५७०६६१२.
कवी- रमेश ठोंबरे
काव्यसंग्रह- प्रियेचे अभंग
प्रकाशक - विजय प्रकाशन नागपूर.
मूल्य-८० रुपये.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected