लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

शुभ्र म्हातारा.

सात पेऱ्यांचा ऊस शोध,
निळ्या डोळ्यांचा शुभ्र म्हातारा म्हणाला.
त्याचा रस असतो गोड,
हिरव्या दाढीचा शुभ्र म्हातारा म्हणाला.
त्याची साखर होते रंगीत
अन पेरांतून वाहतं संगीत,
काळ्याभोर जरठ पायांचा शुभ्र म्हातारा म्हणाला.
शुभ्र म्हातारा सात पिसांची टोपी खोवून
फिरला होता सात खंड,
पालथे घालून बसला होता सात समुद्र.
सतत बोलायचा सात दुनियेच्या गोष्टी म्हातारा.
म्हातारा हसायचा मंद पंधरा चंद्र दात दाखवत.
म्हटलं म्हाताऱ्या नको सांगू पंच महाभूतांच्या फोल गोष्टी.
मला बघ भूक लागली की खातो
थकलो कि झोपतो हाताची उशी करून
तुझ्या सात दुनियेतली एक दुनिया दाखवं.
जिथे सगळ्यांना मिळतं हक्काचं पाणी,
कष्टाची विनासायास भाकर,
जिथं कुणीच नसतो हिन अथवा निगर...
आणि करू शकतात नर-मादी आपापल्या आवडत्या संमत
जोडीदाराशी कुठल्याही आडकाठिशिवाय मैथुन.
शुभ्र म्हातारा अदृश्य झाला
सात पिसांच्या टोपीसकटं......

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected