लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पहाटच्या तिन वाजता...
हेलावून टाकणार्या हंबरड्याने दचकुन जागा झालो....
कळल की शेजारच्या बाईचा दिड वर्षाचा चिमुकला गेलाय न्युमोनीयानं....
तिचा वंशाचा दिवा विझलेला पाहून.....
आक्रंदत होती बिचारी....
तिन महिन्याअगोदर तिचा दारुबाज नवरा....
निघुन गेला होता घर सोडुन.....
भसाभसा सहा पोरी जन्माला घातल्या त्यानं...
रात्री अपरात्री ऊठुन पाणि प्यावं तसा दारु प्यायचा...
तसा चांगल कमवायचा पण दारुत गमवायचा...
एक मोठ्ठ घर अन् राहती जागा सगळं त्यानं दारुत स्वाहा: केलेलं....
आणि मग निघुन गेला.. नामर्दासारखा....
तिच्या एकटीच्या खांद्यावर संसाराचं "जू" ठेऊन..
एक महीना त्याचा शोध घेऊन ती मातीकाम करुन जगायला लागली..
नातीगोती सगळे तोँडापुरतेच बापडे...
पण ती डगमगली नव्हती तेव्हा...
एक दिवस मनं हलकं करायला घरी येऊन बसली..
शिळ्या भाकरी गाईला चारतात आयाबाया..
मागुन घेते म्हणते द्या मी चारते...
अन् दार लावून पोरींना घालते खायला..
घळघळ वाहत होते तिचे डोळे सांगतांना..
विषण्ण मनानं ऐकत होतो आम्ही...
पण हे दुःख कमी होत की काय म्हणुन तिचा मुलगाही हिरावून घेतला काळानं...
एव्हढ्या दुःखानं तर कुणीही वेडंच व्हावं....
पण ती अजुन शाबुत कशी?
लढायची तिची ऊर्मी अचंब्यात टाकायची मला..
वाटलं या आघातान नाहीच सावरणार बिचारी....
सगळ्या मुलींना उराशी कवटाळून टाहो फोडत होती...
आपटुन डोक्याला हिरवंगारं बेँड आलेलं...
तरवटलेले डोळे लालजर्द झालेले....
शेजारधर्म म्हणुन सांत्वनासाठी जमलेल्या आयाबाया...
शोकाकुल... खालमानेनं तिला समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न करणार्या...
तिन की चार दिवसानंतर....
भल्या पहाटेचं ऊठलेलो असतांना...
पदर खोचुनं, पाटी घेउन मला ती कामावर जातांना दिसली....
ति "हिरकणी" जात होती माझ्यासमोरुन.. जगण्याची आपली आयूधं पाजळंवतं... आणि मला दिसतं होतं क्षितिजापल्याडं लालेलाल सुर्यबिँब डोँगराच्या वर येतांना.....!
महेँद्र कांबळे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected