लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

आणि मी अजून धावतोय......!

सई....
कधी बोललो नाही...
पण आयुष्य भळभळतांना..
दिशाहीन भरकटतांना...
तुझी स्नेहार्द नजर त्यावर पडली...
आणि पार डोंगरापल्याडून
मी एक सोनेरी पहाट हसतांना पाहीली...
सई....
कधी बोललो नाही...
पण P.L. मध्ये नाईटा मारुनही परीक्षेच्या भितीनं जेव्हा पाय लटपटायचा....
तेव्हा सकाळीचं तुझ बेस्ट लक आल्यावर...
असह्य चुरचुरणार्या डोळ्यांना....
गुलाब थंडावा मिळायचा...
सई.....
कधी बोललो नाही..
पण तुझ्या ऊबदारं तळहाताचा स्पर्श...
रखरख आयुष्यात हिरवळ भरुन जायचा....
अन् तुझ्या गंधधुंद मिठीत शिरतांना.....
मला जिवंतपणाचा आभास व्हायचा.....!
नैराश्य...
औदासिन्य....
वैषम्य....
प्रतिभेच मोलं न करणारी दुनियादारी....
अवहेलनेन आलेली अस्वस्थ आगतिकता...
मनगटातही पुरेसं बळं नसल्याचा त्रागा....
अवघं आयुष्यचं झाकोळं झाकोळं...
वाटलं हा अंधार नाहीच संपायचा आता...
अश्यात तु मला चंद्र दाखवलास...
तोही पूर्ण उजळलेला...
अन् चार स्वप्न चांदण्या माझ्या ओँजळीत देत म्हणालीस..
स्वप्नांवर विश्वास ठेव...
आता त्याच स्वप्न भरल्या मुठीँनीशी धावतोय....
धावतोय ऊर फाटेस्तोवर..
खाचखळगे,काटेकुटे..
एक एक वळणं पडतय मागं....
दर पुढच्या वळणावर वाटतं....
तू असशील उभी... (आणि दरवेळी तू नसतेसचं)
धाप लागतेय पण ही वळणं संपत नाहीयेत..
रस्ताच संपत आलाय तरी.....
ही वळणे संपत का नाहीयेत..?
आणि मी अजून धावतोय.
महेँद्र कांबळे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected