लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

चिँब पावसाळी भेट...!

मृद्गंधी श्वासांसवे
सजे पावसाळी भेट
भेट अशी की अवीट
भिडे काळजाला थेट.
पानापानातून कसे
... टपटपती हे थेँब
हात हाती तू दिलेला
आले तरारुन कोँब...
उबदार तळहात
मखमल मखमल
लय निसरडी वाट...
टाक जपून पाऊलं.
सैरवैर कशी होशी
येता निरोपाचा क्षणं
तुझ्या डोळ्यात आषाढ
तुझ्या डोळ्यात श्रावण.
ओल्या ओल्या डोळ्यांसवे...
तुझं निरोप गं घेणं
जणू पुढल्या भेटीचं
मुकं आमंत्रण देणं...!!!
महेँद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected