लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

एक इवलिशी प्रेमकथा...!


काँलेजचे धुंद दिवस...
अन् त्यांच वेड वय...
तिला न्याहाळण्याची एकटक...
त्याची खुळी सवय..
... सुरवातीला त्याच्याकडे ती रागानं बघायची
तो दिसताच ओठातचं
काहीतरी पुटपुटायची.
तरी तो तिच्यासाठी वेडापिसा व्हायचा....
ती दिसताच त्याच्या मनमयुराचा
जणु पिसारा फुलायचा.
हळूहळू तिच्या मनातला
राग मावळू लागला...
त्याच्या मनातला प्रितपाझरं..
तिलाही कळू लागला.
आता करत होत्या दोघांच्याही नजरा
एकमेकांशी गुजगोष्टी....
हिरवी धरती, निळं आभाळ..
प्रितमय झालेली सारी सृष्टी.
भावनांची अजब कोँडी
आसवांची सांडासांडी...
तिच्यावरुन त्याच्या मित्रांशी
झालेली त्याची भांडाभांडी...!
काळजातले शब्द त्याच्या
ओठावरती यायचे
ति समोर येताच मात्र...
हवेतचं ते विरायचे..
शेवटी ते काम
एका गुलाबाने केलं...
तिनंही होतं त्याला
कधीचचं मनं दिलं.
आता वाढल्या होत्या त्यांच्या
लपुनछपुन भेटीगाठी
ठरलं होत आधार द्यायचा..
एकमेकांना जन्मभरासाठी.
मधुरं कोकीळेची तानं
अन् आंब्याला आलेला मोहरं...
पहिल्या वहिल्या प्रेमाचा..
अगदी पहिलाचं बहरं..
पण......
पण शेवटी निघाली
निष्ठुर नियती....
तिला आलं स्थळं छानं...
अन् त्याची खुंटली मती.
मध्यमवर्गीय घराचा उंबरा
ती ओलांडू शकली नाही...
तिच्या विरहात त्याच्या अंगाची
होत होती लाहीलाही...!
जपरे स्वतःला,
वसव स्वतःचं घर.
दिपतील जगाचे डोळे..
असं काहितरी कर..!
विसरुन जा मला
अन् मार उंच भरारी..
त्याच्या मनाला दिलेली
तिने शेवटची उभारी...
सोसल्या त्यान असह्य कळा
तिच्या सुखातला तो
नाही झाला अडथळा..
शेवटी ती चढली बोहल्यावर...
निनादत होते तिच्या भोवती सनईचे सुर...
त्याच्या वाट्याला मात्र बाटली अन् कोंदट सिगरेटचा धुरं.....
शेवटी बर्याच दिवसानंतर तो सावरला.
तिला दिलेल्या वचनाला जागला....
आता त्याच्याकडे नव्हती कमतरता
पैसा अन् प्रतिष्ठेची...
पण त्याला सोबत होती
केवळ तिच्या आठवणींची.....
दिसं मास ऋतु उलटले
उलटुन गेली दशके चार....
नियतीने पुन्हा फिरवलं
आपल चक्र एकवार...
त्याच्या वृध्दाश्रमात एकदा
ती त्याला भेटली
जाड भिंगाच्या चष्म्यातुन त्याला
जन्मोजन्मिची ओळख पटली...
तिच्या भाळी नसलेलं 'कुंकू' पाहुन....
क्षणभर तो बधीरचं झाला...
इतक्यात त्याच्या कानावर
तोच ओळखीचा आवाज आला....
दाताच बोळकं सावरत ती म्हणाली..
देशील ना रे मला आधारं.....
अन् क्षणात त्यान मोडीत काढले
समाजाचे शिष्टाचार...!
काठी सावरतं तिचा खरखरीत हात...
त्यान स्वताःच्या हाती घेतला....
शेवटी तिच्याचसाठी तो
होता आजन्म अविवाहित राहिला..
वृध्दावस्थेत एकमेकांची
त्यांनी सोबत केली...
तिची त्याची इवलीशी प्रेमकथा अशी पुर्णत्वास गेली.....!!!
(अर्घ्यदानं)
महेँद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected