लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

चिडखोरं....!

 मी चिडतो खुप चिडतो..
अगदी चिड चिड चिडतो
सकाळी लवकर जाग नाही आली
म्हणुन चिडतो...
नळाला आज पाणि नाही
... म्हणुन चिडतो...
दुधवाला उशीरा आला
म्हणुन चिडतो..
लोडशेडीँग मध्ये डोक्याला ताप म्हणुन चिडतो....
कुठलही कारण चालत माझ्या चिडण्याला
तुरडाळीचे भाव गेलेत गगनाला...
भाजीपाला प्रचंड महागला..
बाजारात आहे गॅस अन् राँकेलचा तुटवडा..
टपरीवाल्यान दिला नाही गरमागरम बटाटावडा...
सर्रास सिग्नल तोडणारे
खुलेआम चिरीमिरी घेणारे..
निवडुन येताच जनतेच्या डोक्यावर
थयथय नाचणारे
साधा सातबारा देतांना
टेबलाखालून हात समोर करणारे..
हे सगळं मी हताश डोळ्यांनी बघतो
अन् मला हे बदलता येत नाही म्हणुन चिडतो
खुप चिडतो... चिड चिड चिडतो...
एव्हाना मला तुम्ही ओळखलं असेलचं...
भ्रष्टाचाराच्या,
जातिव्यवस्थेच्या वाळवीनं पोखरलेल्या
जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात
माझं अस्तीत्व प्रत्येक जागी तुम्हाला जाणवेलं
प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला दिसेल...
मुलाच्या अँडमिशनच्या रांगेत..
गॅसच्या रांगेत..
ट्रेन,बसच्या टिकीटांच्या रांगेत..
किराणा दुकानाच्या रांगेत...
सरकारी रूग्णालयांच्या रांगेत....
मी असतो कायम रांगेत....!
आजवर खुप लिहील्या गेलंय माझ्यावर..
एक पुतळसुध्दा उभारलाय माझा
चित्रपटातुनही होतात माझे लिलावं कधीकधी...!
मी आहे तुमच्यातलाच एक सामान्य माणुस..!
जो चिडतो पण हारत नाही..
कुठल्याही संकटाला कधीच डरत नाही...
सामान्य जरी असलो तरी माझ असामान्यत्व जगमान्य आहे..
कारण.....
मी चिडतो खुप चिडतो
अगदी चिड चिड चिडतो
पण आयुष्याची लढाई रोज नव्याने लढतो....!
(अर्घ्यदानं)
महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected