लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

क्रांती...


Thursday, January 3, 2013 at 6:54pm ·
आद्य शिक्षिका माता सावित्री यांची आज जयंती..
बा ज्योतिबाला पुरेपुर साथ देत समाजात क्रांती घडवणारी माता सावित्री.
तथापी फक्त मुलींना शिकविण्या बरोबरच अजुन एक फार मोठं कार्य त्यांनी केलयं.
पुर्वी बालविवाह प्रथा अस्तित्वात होती आणि तरुणपणीच वैधव्य येण्याचं प्रमाणही बरचं, विधवा पुनर्विवाह तर पापचं मानण्यात येई पण अश्या तरुण विधवांवर कित्येकवेळा घरातच लैगींक अत्याचार केल्या जाई आणि साहजिकच त्यावेळी गर्भनिरोधकं उपलब्ध नसल्यामुळं तिला एकतर आत्महत्या करावी लागे किंवा कसातरी चोरुन लपुन बाळाला जन्म दिल्यावर बाळाला फेकावं लागे..
अश्या दुर्दैवी मुलिंच्या बाळंतपणासाठी धावुन गेले ते बा ज्योतीबा आणि सावित्री. केव्हढी करुणा होती दोघ्यांच्याही उरात किती माणुसकी जपली त्यांनी.
खालच्या कवितेतुन माणुसकिचा तो पैलु मांडण्याचा प्रयत्न केलायं. माता सावित्रीला विनम्र अभिवादनं.
*क्रांती...
सागरगोट्या खेळायच्या वयात लग्न ठरलं
पोलकं परकर सोडुन मी
मग लुगडं पेहरलं..
दिसं सरले आनंदाने
मी झाले न्हातीधूती
पण हाय रे दैवा
अपघातीच गेला पती
तो काळचं असा होता
प्रत्येका बाईसाठी
वैधव्य घेऊन जगणं..
मरणचं जणू तिच्यासाठी
एक दिवस आभाळ कोसळलं..
एकटिला बघून दिरानं धरलं..
तोंड दाबून बुक्क्याचा मारं..
सोसला कैकवेळा अत्याचारं...
त्याचा अंकूर मग
पोटात वाढू लागला...
जिवं देण्यावाचुन मग
पर्यायचं नाही उरलां...
पण रुढीच्या छातिवर देउन पाय...
धावले बा ज्योतिबा
धावली सावित्रा मायं..
घेउन गेले घरी मला
जणू स्वतःचीच लेकं..
माझ्यासारख्याच पिडित तेथे
अजुन होत्या कैकं..
आईच्या ममतेन केलं
माझ बाळंतपणं..
कोमेजु नाही दिलं
बाळाचंही बाळपणं
धन्य बा ज्योतीबा
धन्य सावित्रा माई
आजची पिढी त्यांना
कशी विसरली बाई?
महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected