लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पुस्तक - अधांतरी


शेवटची ओळ संपवुन पुस्तक मिटतांना कधी शहारलात का? खुप जणांनी खुपवेळा हा अनुभव घेतलाही असेलं..
ब-याच दिवसानंतर एक अस्सल कलाकृती हातात घावली... जयवन्त दळवी लिखीत मॅजेस्टिकची कांदबरी 'अधांतरी'..
भाऊसाहेबांची ययाती संपवल्यावर असाच अंगावर सुखद काटा आला होता...
मी दळविंना याअगोदर वाचलच नव्हतं पण पहिल्याच कांदबरीत या माणसान मला खिशात टाकलं.
पहिल्या ओळिपासून सुरवात केल्यावर सरळ शेवटावर आल्यावर कळतं की कांदबरी संपलीय.. ईतकी ओघवती आणि प्रवाही भाषा.. तुफान वेग आहे त्यांच्या शैलीतं कथा फुलवण्याचं मोहक तंत्र... फिदाच एकदम.
साऊ उर्फ सावित्री एका गवय्याची मुलगी तिची आई एका तबलजीचा हात धरुन पळुन जाते. वडिल त्या धक्क्याने लवकरच जातात मग तिची निपुत्रिक आत्या बायजी तिला सांभाळते. तरुण झाल्यावर कुणीही वळुन बघावं असं रुपं, त्या धास्तिनं दहावीनंतर पुढे बायजी तिला शिकुच नाही देतं. नंतर शामु नावाच्या प्राध्यापकासोबत तिचं लग्न होतं ब-यापैकी समंजस, अतिव प्रेम करणारा नवरा. असा सुखी संसार पण एक मुलगा झाल्यावर तिला जाहिरातीच्या कंपनीत नोकरी मिळते तिथं केटी नावाचा चमको बाँस येतो आणि तिच आयुष्य वेगळ्या वळणावर येतं तो तिला बढती देऊन पब्लिक रिलेशन ऑफिसर करतो.. ति त्याच्या मॅग्नेटिक पर्सनॅलिटीकडे आपसुक ओढल्या जाते. त्याच्या प्रेमात पडते. आधी टिपीकल हाउस वाईफ असलेली ती मग प्रोफेशनच्या नावाखाली दारु पिणं, उत्तान कपडे, भडक मेकअप अश्या गोष्टित अडकत जाते. यात तिच्या नव-याची घुसमट होते मुलगा अबोल होऊन दुरावतो शेवटी ती
नव-याला सोडुन केटिसोबत राहते नंतर तोही तिला सोडुन निघुन जातो.. मग उरत एक भयंकर भकासलेपणं...
वाटणं आणि वाटत तसं करणं यात खुप फरक असतो. अनैतिक लैगींक आकर्षण वेळिच काबुत करायला हवं, नेहमीच भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही कारण काही मुल्य आपण मानली नाहित तर आपली गत कुत्र्यामांजरासारखी होईलं. लैंगीक सुख हा एकुण सुखाचा एक छोटा भाग आहे त्यावर मॅग्नीफाईंग ग्लास धरुन मॅग्निफाय करण्यात अर्थ नाही. विषयोपभोग हे त्याच तिव्रतेन पुरत नसतात आपलं भावनिक नात्यागोत्याच विश्व महत्वाचं ते पुढ जिवनाला रस, चैतन्य देतं. ती फुलं कधिच बावून जात नाहित किंवा त्यांचा रंग कधिच ऊडत नाही. संसार म्हणजे जुळवुन घेणं सांभाळुनं घेणं..
अधिक सुखाच्या हव्यासान शेवटी भयंकर एकाकीपणच वाट्याला येतं. अस बरच काही शिकवतं हे पुस्तकं..
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected