लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

बिढारं:- एक अस्सल नेमाडपंथी अनुभवं..

एखाद्या आवडत्या गावाला जायचं असल्यावर लहान मुल किती हरखुन जातं. त्यात मग ट्रेनची विन्डो मिळाल्यावर क्या बातं!!. मग ट्रेन शिट्टी देते, हळूहळू वेग घेतो. मग झाडं ,माणसं पळतांना बघणं. चॅय्यवाला भेळं... किती रंगून जातं ते मुलं. माझंही अगदी तसचं झालं निमीत्त भालचंद्र नेमाडेंच 'बिढार'..
मी नेमाडेंच्या लिखाणाचा ,शैलीचा आणि त्यांच्या मिशांचाही जबरदस्त फॅन आहे. ऑल टाईम ग्रेट कोसला आणि बहुचर्चीत हिन्दू यांचा हँगओव्हर अद्याप उतरलाच नाही. त्यामुळे बिढार सुरु केलं तेचं रोमांचीत अवस्थेतं आणि मग हळूहळू वेग घेतं अपरिहार्य रंगून जाणं..
कादंबरीची सुरुवात चांगदेवं या कादंबरीच्या नायकाच्या दुर्धर आजारपणापासून होते पण त्याला काय झालं हे कळायलाचं 86व पानं यावं लागतं तोपर्यंत उत्कंठा ताणुन राहते.
कादंबरी एकदम सळसळती आहे, चांगदेव आणि त्याचे भयंकर क्रिएटीव्ह मित्रं. जग बदलु पाहणारं अमाप ऊर्जेचं तारुण्यं.. आजारपणामुळे निराश होऊन भयंकर वैराग्य येऊन स्वतः स्वतःलाच अंताकडं नेणारा आणि अकस्मात त्या आजारातून आश्चर्यकारकरित्या वाचल्यावरं पुढचं आयुष्य सकारत्मकतेनं जगायचं ठरवणारा चांगदेवं वाचकाला बांधुन ठेवतो. आजारपणातलं त्याच भावविश्व अप्रतिमं रेखाटलय पणं यात सौँर्द्यपुर्ण पध्दतीन काही सामाजीकं प्रश्नही हाताळलेतं जसं 'प्रकाशकाची ऐतखाऊ संस्था'.. दुसरीकडं लिहिणारे बेसुमार वाढलेतं ज्याला त्याला प्रसिध्दिची घाई झालीय मग पैसे घेउन छापणारं नाहित काय? हा सवालंही येतो.
पण जादु आहे नेमाडेंची शैली म्हणजे, कोसलात जसं उदाहरणार्थ, थोर, हे मात्र फारचं झाले असे शब्द येतातं तसचं रामराव नावाच्या कॅरॅक्टला धरुन ईथं 'सहेतूक' हा शब्द येतो त्यांच वागणं, बोलणं, हसणं ईव्हन दुर्लक्ष करणही सहेतूकचं..
सहेतूक आला कि गुदगुल्या ठरलेल्याचं.. करंटेपणाची पदकही आनंदान मिरवता यायला हवितं असलं अद्भुत तत्वज्ञान आहे या पुस्तकात बाकी
फक्त नेमाडेंच्या मुठीत आपलं बोटं द्यावं एक सुंदर सफर आपोआपचं घडते..
(एक सामान्य रसिकं)
महेंद्र गौतमं.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected