लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

जन्माला यावं अन् एकदा प्रेम करावं..,

मनाच्या रित्या कोप-यात
नाव तिचं कोरावं
कामाच्या धबडग्यातही
जरा तिच्यासाठी झुरावं..
जन्माला यावं...
अन् एकदा प्रेम करावं...
मग चंद्र जवळचा वाटतो
ता-यांची ओढ लागते..
प्राजक्त भुरळ घालतो..
कविता रुचतात, कधी कधी सुचतातं...
तमाम सिनेमांची गाणी
आपली आपली वाटतातं..
डोळ्या-डोळ्यांनी बोलणंही..
मोठं गोड असतं...
सकाळ संध्याकाळ मनाला
तिचंच वेड असतं..
वाढदिवशी बाराला तिचा
फोन असतो घ्यायचा
मित्रांच्या शिव्या खात
नंतर केक असतो कापायचा...
रोज संध्याकाळी ती
गॅलरीत येते...
अशी रोज रोज मग...
ईद मुबारक होते...
एखादा चोरटा स्पर्शही
हवाहवासा असतो..
स्वस्त मोबाईल प्लॅन
कुणी शोधत बसतो..
पाऊस आला म्हणजे आपणं
शेवरीचा कापूस होऊन जातो..
मनातल्या मनात तिच्यासोबतं..
कितिदातरी भिजून घेतो..
पण एखाद स्वप्नं
पुर्ण होण्याअगोदर जाग येते....
अख्खा दिवस त्या स्वप्नापायी
मन कसं हुरहुरुन जाते...
तरी मनाच्या कोप-यात
तिचं नावं कोरावं...
कामाच्या धबडग्यातही
कधी तिच्यासाठी झुरावं...
जन्माला यावं......
अन्
एकदा प्रेम करावं...
महेंद्र..
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected