लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

भाकरीच्या कविता..

चारी बाजुंनी अंधार हजारो हातं उगारत चाल करुन येतांना एखाद्या काजव्याचं क्षणीक लकाकणंही कुणालातरी प्रचंड धिर देऊन जातं. प्रकाशाची ती एक झलक झगडायची हिंम्मत दुपटीने वाढविते...

आपल्याकडे एक वर्ग असाही आहे ज्याच्यापुढे भाकर हा मुलभूत प्रश्न आहे. एकिकडे पानावर आणून हातावर खाणारा वर्ग तर दुसरीकडे सोन्याच्या ताटात चांदीच्या चमच्याने खाणारी माणसं.. ही तफावत सलणं सहाजिकचं.. अलोट दुःखात एखादाच सुखाचा आलेला क्षण उत्सव म्हणून साजरा करणारी सकारात्मक माणसं कशी झगडत असतील भाकरीसाठी?

जसं सुचेल तसं लिहायचा हा एक छोटासा प्रयत्नं..

"भाकरीच्या कविता.."

पोचल्यास दाद द्याचं पण त्याहीपेक्षा निर्मळ टिकेचं मनापासुन स्वागतं.

महेंद्र गौतम.

-----------------------------------------------------------------------------

1.

या येळलां...

मिरगं जोरदार पडल्यावर

किती मोहरलो..

बैलासंग बैलाईतकच राबलो..

सावकाराचे उपकारचं..

दिढीमाढीन का व्हयंना..

पेरणी तं साजरी केली..

आता हे डोलणारे

हिरवे हिरवे जवारीचे धांडे..

कसं हिरवंगार वाटतयं...

अडत्यांना जरा बुध्दी येऊ दे..

या साली जरा भाव मिळू दे..

कणगीत दाणे असेच खेळू दे..
महेंद्र गौतम
-----------------------------------------------------------------------------------

2.

या येळला...

इंटरव्हू तं जोरदार गेला..

सगळ्याच प्रश्नाची उत्तर ठाऊकं..

लोकायसारखा सिगरेटचा नादं..

आपल्याला कव्हा परवडला?

पण रातीतून तंबाखुचे बार लावतं

केलेला अभ्यास आता कामी आला..

डि.एड. करुन बी विनाअनूदानीतवर कामं...

त्यापेक्षा गावची ढोरं बरी वाटायची

अन् आपल्याजवळ कुठले पंधरा लाखं...

ज्याच्याजवळ होते ते चिकटले कायमचे...

सोय-यायसाठी अन् कमाईसाठीच तर

ईथ संस्था निघतातं...

आपण मात्र घडवायचे विद्यार्थी...

एकदा अनूदानीतवर लागू दे.

भरल्या पोटानं आनंदान जगू दे..
महेंद्र गौतम
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected