लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

हेवा.

बुलेटप्रुफ कारमधून तुम्ही हिंडता
झेड सुरक्षेत डरकाळ्या फोडता
तुम्ही कुणालाही हवं तसं वागवता, वाकवता आणि नाचवता
जो तो येऊन तुमच्या समोर हात जोडतो
खरच मला तुमचा हेवा वाटतो
तुमच्या एका शब्दाने ईथे मारामा-या होतात
तुमच्या नुस्त्या बोलण्याने माणस पेटतात.
तुम्ही घडवू शकता
मोर्चे आणि दंगली सुध्दा
तुम्हाला घाबरतात माणसे
वाईट आणि चांगलीसुध्दा
तुमच्यातलाच कुणीतरी मग
प्रती मंत्रालयच चालवतो
खरचं मला तुमचा हेवा वाटतो.
निवडणुकीसाठी तुम्ही करोडो खर्चता
निवडून आल्यावर वसुलही करता
तुमच्या नुस्त्या चिठ्ठीने
ईथे सगळी कामे होतात
नामांकित लोकही तुमचे पाय चाटतात
तुम्हाला अपचन कस होत नाही हा विचार मी करतो
खरच मला तुमचा हेवा वाटतो
प्रतीपक्षावर तुम्हि चिखलफेक करता
चक्क त्या पक्षात जाऊन
त्याचेच गोडवे गाता
रंग बदलण्याच्या बाबतीत
सरडासुध्दा तुम्हाला लाजतो
खरच मला तुमचा हेवा वाटतो
तुमच्या आशीर्वादाने ईथे
गुत्ते, अड्डे चालतात
राँकेल, वाळुमाफीया लोकांना लुटतात
भरधाव अँपेवाले लोकांना चिरडतात
सगळ्यांच्या पाठीवर तुमचा हात असतो
खरच राव, मला तुमचा हेवा वाटतो.
सगळ्या रंगाना तुम्ही बापाची जागीर समजता
सर्रास महापुरषांना दावणीला बांधता
मतासाठी माणसांना धर्म जातीत विभागता
तरी मी तुम्हालाच मत देतो
खरंच मला तुमचा हेवा वाटतो..
महेंद्र गौतमं.
(अर्घ्यदानं)
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected