लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पुस्तक -'आहे काँर्पोरेट तरी'

अस्सलं कलाकृती काय असते? मला वाटतं जिचा आस्वाद घेण्याचा वारंवार मोह व्हावा आणि दरवेळी त्या कलाकृतीनं पहिल्याईतकाच उत्कट आनंद तुम्हाला द्यावा, मग ते एखाद धुंद गाणं, सिनेमा असो किंवा पुस्तक असो.
घरचं पुस्तकाचं कपाट ब-याच दिवसानंतर निटं करत होतो आणि साधारण दोन वर्षाअगोदर घेतलेलं एक पुस्तक हाती लागलं. श्री. संजय जोशी' लिखीत, 'आहे काँर्पोरेट तरी'.
एका लोकविलक्षण अवलियाचं हे चकित करणार आत्मकथनं.
"झगमगत्या काँर्पोरेट विश्वात 'बिग बाँस' बनुन वावरल्यानंतर त्या मोहमयी दुनीयेकडे पाठ फिरवणा-याला कुणीही वेड्यात काढावं. पण महिन्याला लाखो रुपये पगार, मानमरातब आणि वाट्टेल तेव्हढे अधिकार हाती असुनही नोकरी सोडून देणारेही असतात. काँर्पोरेट दुनियेच्या मोहमयी जगात रमण्याऐवजी सर्जनशील जगण्याचा आनंद मिळवण्यासाठी 'हटके' पाऊल टाकणा-या एका 'बिग बाँस'ची ही गोष्ट."
पट्टीचा वाचणारा एकाच बैठकित हे पुस्तक संपवेल एव्हढं प्रवाही लिहिलं आहे. रटाळपणा कुठंच नाही त्यामुळं वाचतांना एकही जांभई येतं नाही. एक विलक्षण वेग, ऊर्जा आहे या पुस्तकातं, वाचणारा आपसुकच 'पेटतो',( प्रेरीत होतो).
मला सबंध पुस्तकभर 'ऑलकेमिस्ट'मधला स्वप्नांच्या मागे धावणारा सँतिऍगो आठवला पण ऑलकेमिस्ट ही 'परिकथा' आहे आणि हे पुस्तक 'खरीकथा' आहे.
'स्वप्ने अशी पाहिन ज्यांना गंध मातीचा मिळो
गंध जगण्याला मिळो माझ्याच त्या स्वप्नातला'.
डायरेक्ट जगण्याला भिडायची उर्मी देणा-या, सर्जनशिलतेचा वसा जप म्हणणा-या या पुस्तकाला आणि श्री. संजय जोशी यांना कुर्निसात, दिलसे सलामं.-^-
मर्म जगण्याचे उमजता मी अश्या शब्दांत गावे
शब्द व्हावे मंत्र ज्यांना अर्थ ये मौनातलां...
महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected