लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

गझल.2

काही नवे शेर आणि काही चुकांची दुरुस्ती करुन परत पोस्ट करतोयं.

तुझे गोड कावे तुझे फोल दावे
अता जाणले मी तुझे बारकावे.
कशाला जगाची तमा बाळगावी
कशाला जगाशी अता मी लढावे.
मला साथ आहे इथे वादळांची
खुळ्या संकटांनी जरा दूर व्हावे.
तुझ्या त्या तिळाची किती गं मुजोरी
तुझ्या काजळाने किती गं छळावे.
नवा सूर आहे नवा ताल आहे
नवा कंठ आता नवे गीत गावे.
करा पिंज-याची कवाडे निकामी
नभी पाखरांच्या उडावेत रावे.
नको घेउ हाती जगाचा तराजू
तुझ्या काळजीने मला पारखावे.
असा संपलो मी असे वाटतांना
तुझ्या वेदनांनी फुलारून यावे.
किती तू गहीरा दिला घाव होता
किती सावरावे कसे सावरावे.?
अकस्मात जेंव्हा समोरून आली
कळेना मनाला कसे आवरावे.
नवा आरसा की नवा चेहरा हा
नव्याने कसे मी हसूनी जगावे.
नशीबात आहे अशी ही फकीरी
सुखाचे मला तू अता दान दयावे.
महेंद्र गौतम.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected