लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

झुंडी

तू गं उफणती नदी
माझी मोडलेली नावं
मंझधारेत भोवरा
सांग गाठू कसा गावं..

मखमली पात्रातून
मगरींचा गा वावरं
हाती बोथटला भाला
कसा लागेल टिकाव

इथे नरभक्षकांच्या
अश्या झुंडी वाढलेल्या
घाबरल्या अंधाराला
साऱ्या सावल्या पांगल्या..
महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected