लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

धर्म1

ही कुठली निळीजांभळी अद्भुत
फुलं उमललीयेत तुझ्या साध्याभोळ्या गावात अचानक.
किती पसरलाय हवेत हा मुग्धमादक गंध.
कसलं दैवी सौंदर्य लेवून आलीयेत
ही सुकुमार नाजूक फुलं.
बघणारा नजरबंद होतो ,भुलचकीत होतो
आणि बघता बघता बुडून जातो
या गुढघन जांभूळ डोहात भ्रमिष्टासारखा..
तुझा भाबडा गावं आता भाबडा उरला का?
अजून एक सांग....
ही रंगीबेरंगी निरागस फुलपाखरं
त्या फुलांवर बसताक्षणीचं
का पटापट मरून पडतायत?
महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected