लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

आत्ममग्न कविता 8

डोक्याची होतील हजार शकलं
आणि जाऊन पडशील त्या विदीर्ण प्रदेशात,
जिथे दिवसा असेल अंग होरपळवणार उन्ह
आणि हाडं गोठवणाऱ्या  थंडीच्या असतील बोचऱ्या रात्री.
जिथे सावलीसाठी नसेल साधं झाडही
आणि उबेसाठी नसेल कुठलीच शेकोटी.
आतडे पिळवटणारी लागेल भूक
आणि होशील तहानेन व्याकूळ
तरी मिळणार नाही अन्नाचा कण,
आणि नजरेलाही पडणार नाही पाण्याचा टिपुससुद्धा.
तरी मरणार मात्र नाहीस जगशील,
जगशील अंग आणि मनभर वेदना वागवत.
म्हणून “तिच्या” वाटेला जाण्याअगोदर विचार कर....

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected