लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

माझ्या उत्क्रांतीचे अवशेष

खरतर रोजच्या जगण्याचेचं मूलभूत प्रश्न सोडवता सोडवता तोंडाला फेस येतो तिथ दुसर काही करावं अस मनात असून देखील करता येत नाही. तुकडे तुकडे झालय सालं आयुष्य म्हणजे. पण रोज काहीतरी नजरेस पडतं अन काम बिघडतं सगळ्या दिवसाच मातेरं होऊन जात.
हा डोळ्याखाली हिरवट काळपट मोठा ठिपका दिसतोय ना? हा तो अस्वस्थपणा सहन न होऊन तोंड उघडल्याचा परिणाम आहे बघ, बस मध्ये चढलो होतो ऑफिसला जायला, तूफान गर्दी. सगळ्यांनाच जायचं असत पोट जाळायला मग गर्दी होणार नाहीतर काय? समोर एक मुलगी होती रे नाजुकशी. उभी होती कशीबशी आणि तिच्या मागून एक दांडगा रेडा, चेहऱ्यावर माज ओसंडून वाहणारा गर्दीचा बहाणा करून खेटतोय भोसडिचा तिला मागून. चेहरा त्रासिक झाला बिचारीचा एक दोनदा, भैय्या जरा सिधा खडा रहोना अस काकुळतीन तिनं सांगूनही तो आपला चिटकतोच आहे. पार रडवेली झाली बिचारी, वास्तविक त्याला नीट उभ राहता आल असतं. पण नराला अशी मादी चेंगरायला भेटल्यावर तो चान्स कशाला सोडतो. मला तिचा तो दीनवाणा चेहरा बघवेना, त्याला बोललो जरा नीट उभा रहा ना भाऊ समोर मुलगी उभीय तुझ्या. तुला काय करायच भेंचोत? तिला काही प्रोबल्म नाही? तू भाऊ लागतो की नवरा लागतो तिचा म्हणत तो सरळ अंगावरच आला.मी म्हटलं नीट बोल हरामखोरा अन त्यान मजबूत ठोसा दिला ठेवून वर कॉलर पकडून अजून एक कानफाटात बसली अन झांज आली मला, भेलकंडलोचं. मग सोडवा सोडवी झाली आणि कंडक्टरनं उतरवल त्याला पुढच्या स्टॉपला. त्या बिचारीन पाणी दिल मला, शर्टच्या गुंड्या तुटल्या डोळा हिरवाकाळा झाला बोंबलल त्या दिवशीच ऑफिस. हे अस आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये वागायची साधी अक्कल नाही आपल्याला कुणी महिलांसाठी राखीव सीटवर बसतं एखादी बोलायला गेली की निर्लज्जपणाने म्हणतात तुम्हाला मीच दिसलो का? आम्ही काय फुकट बसलो का ? साले साड्या नेसून बांगड्या भरून का येत नाहीत हे सगळे? म्हाताऱ्या , अपंग लोकांसाठी राखीव जागेत धडधाकट तरणे पोर बसतात बर एखादा म्हातारा आलाच तरी त्याच्याशी हुज्जत घालतात, उठायच नाव नको, कुठून येतो एव्हढा माजोरडेपणा? की तो असतोच आपल्यात आणि बळी तो कानपिळी या न्यायान वर येतो आपोआप. बर हे दुबळ्यावर मिजास दाखवणार यांच्याहून मुजोर,रग्गेल कुणी आला की शेपूट घालणार. आणि आपल्या डोळ्यादेखत अश्या गोष्टी घडताना पाहून आपल्याला आपल्या गांडूपणाची चीड येते मग कुठेतरी ती चिडचिड निघते किंवा मनात मुरत राहते ,ठसठसत राहते.अवघड जागचं गळू ठसठसाव तस.
महेंद्र गौतम.
(माझ्या उत्क्रांतीचे अवशेष)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected