लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

WWE (डब्लू डब्लू ई) - मला WWE (डब्ल्यू डब्ल्यू ई ) आवडतं

WWE

अगदी तूफान आवडतं, मला डब्ल्यूडब्ल्यूई  (WWE) आवडतं. 

मऊ कोचावर बुड आदळवत मी डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) बघतो.

आडदांड मसक्युलर पहिलवान बघितले की 

 मी लहान मुलासारखा हरखतो..,

एकजण चार चार जणांना उचलून आदळतांना माझ्या मुठी आवळतात.

रोमन रेन्स (ROMAN REIGNS) सुपरमॅन पंच हाणतांना, 

सेथ रोलीन्स  (SETH ROLLINS) सुसाईड डाय मारतांना,

आरकेओचा (RKO) स्म्याक बघताना मी सुपर एक्साइट होतो.

मी सोमवार ते शुक्रवार मान मोडून काम करतो.

चुकल्यावर चार चौघात बॉस मला झाप-झाप झापतो, मी मान खाली घालून झापे खातो,

त्याबदल्यात मला कंपनीकडून मजबूत आर्थिक मोबदला मिळतो.

मी शनिवार रविवार बायकोसोबत बाहेर जातो, डिमार्ट मध्ये खरेदी करतो.

मूवी बघतो, मॅकडीत जातो, संध्याकाळी बियर पितो..

जातीतल्याच कमावत्या सुंदर मुलीशी मी मजबूत हुंडा घेऊन लग्न केलय.

मला माझ्या जातीचा गर्व आहे, मला माझ्या धर्माचा गर्व आहे.

मला माझ्या देशाचा गर्व आहे, देशाच्या सैन्याचा गर्व आहे.

मला अमक्या तमक्या लोकांना घरात घुसून मारावं वाटतं

टमक्या लोकांच्या मुंड्या तलवारीने छाटाव्या वाटतात.

ढमक्या देशाला जगाच्या नकाश्यातून नेस्तनाबूत करावं वाटतं.

मागे एकदा अंधार्‍या गल्लीतून जातांना दोन भुरट्यांनी मला पकडल.

माझा मोबाइल, पॉकेट हिसकल..,

कॉलर पकडून दोन कानपटात ठेवून दिल्यात तेंव्हा मी फळफळा मुतलो होतो..,

मला डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आवडतं, अगदी तूफान आवडतं.

मऊ कोचावर बुड आदळवत मी डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) बघतो..! 

                                                                                                                -महेंद्र गौतम.

  • हे देखील वाचा ✅

  1. धर्म भाग - १   
  2. अर्थ 
  3. मी तयार आहे.
  4. मी जगुयात मात्र नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected