लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

गोष्ट मुंबईची : मुंबई चे जीवन

गोष्ट मुंबईची

गोष्ट मुंबईची, मुंबई भिनत जाते तुमच्यात लोकल वाहत राहते रक्तातून. उर दडपवणाऱ्या राक्षसी गर्दीचा तुम्ही केंव्हा भाग होऊन जाता कळत पण नाही. परवा घाईत नेमका लगेजच्या डब्ब्यात घुसलो तिथे एक ग्रुप हसत खिदळत चाललेला. खदखद हसवणारे जोक्स, पटकन दोस्ती झाली म्हटल सगळेच एका जागी जॉब करता का? सगळे हसले "नाय रे सगळे वेगवेगळ्या जागी आहेत पण 11 वर्षापासून एकाच ठरलेल्या डब्ब्यात मग जुळतात ऋणानुबंध तू पण येत चल हां". दादर कधी आल कळल पण नाही जातांना खांद्यावर थोपटून डोक्याला कुरवाळत बाय..,

संध्याकाळी साईट संपवून परतत असतांना डब्ब्यात हातात पिशवी घेऊन डोळे मिटून ध्यानस्थ मुन्यासारखा वाटणारा,भरगच्च काळ्यापांढऱ्या दाढीचा, अर्ध चमचमणार टक्कल असलेला एक माणूस.. त्याने एक स्टेशन जाऊ दिल आणि पिशवी सावरत अचानक गाऊ लागला  " एक दिन बिक जाएगा माटी के मोल जगमे रह जायेगे प्यारे तेरे बोल.." मी मुकेशचा एव्हढा मोठा फॅन नाही तरी त्याच वावड देखील नाही मुड आलाच तर कधी चांदसी मेहबूबा किंवा चंदनसा बदन ऐकतो पण गाणाऱ्याच्या आवाजात बात नक्कीच होती तो तल्लीन होऊन गात राहिला  कुणास ठाऊक कशी पण तंद्री लागली कुणीतरी बोट धरून भुतकाळात घेऊन गेल्यासारख वाटल मधली पाच सहा वर्ष गळून पडली तेंव्हा लाथाडलेली चांगल्या पॅकेजची नोकरी गमावलेले  काही लाख, हातात दोन पुर्ण पुस्तक आणि दोन अर्धवट सिनेमे,आत सगळा कोलाहल माजला, स्वप्नांच्या माग ऊर फाटेस्तोवर धावण आठवल.

मस्त आलाप घेऊन तो त्या दरवाजातून या दरवाजात आला जणू त्याचा  स्टेज परफोर्मन्स सुरुये असा, नेमका माझ्याजवळ. आपसूक हात खिशाकड वळला आणि त्याने खांद्याला थोपटून मला थोपवल अधूर गाण पूर्ण केल..

"पैसो के लिए नहीं गाया दोस्त. भगवान की दया से दो चाल और तिन टैक्सीया चलती है इस गरीब की मुंबई में. 55 साल पहले एक ख्वाब लेकर लखनऊ से यहाँ आया था बस भूक ने वो ख्वाब निगल डाला मायानगरी तो हमें रास नहीं आयी.. अभी कभीकभार ऐसे ही कलाकार होने की खुजली मिटा लेता हू " त्याच्या डोळ्यात कसलीतरी अभिजात अस्वस्थता दिसली " पिशवी सावरत तो पुढच्या स्टेशनवर उतरून गेला, त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत मला "सं.भा."च्या ओळी आठवल्या,


"उरात होती स्वप्ने आणिक
स्वरात होते गाणे
कुठे जायचे होते
आले कोठे पाय दिवाणे."

-महेंद्र गौतम


  • हे देखील वाचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected