लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

का? - आपण असंच मरायचं का?

विद्रोही कविता

ते टिपून मारतील
आपण असंच मरायचं का?
ते जिवंत जाळतील
आपण असंच जळायचं का?

किती युगांची आहे
त्यांची रक्ताची तहान तरी
नरड्यात सुळे खुपसतील
आपण असंच किंचाळायचं का?

ते आळीपाळीने बलात्कार करतात
भोगल्यावर प्रेत झाडाला टांगतात
मुजोरीने विकट हसतात
आपण भेदरून पळायचं का?

मस्तकाच्या होतील ठिकऱ्या
अन छातीचा होईल बुकना
ते राजरोस छातीवर नाचतील
आपण असंच हळहळायचं का?



-महेंद्र गौतम.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected