लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

भाजी विकणारी म्हातारी.

मराठी कविता - भाजी विकणारी म्हातारी

सुरकुतलेली भाजी घेऊन
भगभगलेल्या सुन्न दुपारी
झाडाखाली बसली असते
चुरगळलेली एक म्हातारी.


सुस्तसे कांदे लसूण मेला
मरगळलेला एक भोपळा
तीव्र उन्हाने करपून गेला
मटकीचाही कोंब कोवळा.


रंग उडालेली कोथिंबीर
म्हातारीची वदे कहाणी
अलगद निरपून काढत असते
डोळ्यांमधले उदास पाणी.


विकत बसते दिवस दिवसभर
पुढ्यातली ताजी तरकारी
चावत बसते भूक लागता
ठेच्या संगे शिळी भाकरी.


ठिगळ लावलेले एक लुगडे
उसवलेली एकच चोळी.
तरी हासते ग्राहक येता
म्हातारी ती साधी भोळी.


छळती मजला जीर्ण ते डोळे
ओठांवरचे हास्य कोवळे
किती भोगले असतील आजवर
दुःखाचे तिने खिन्न सोहळे.


मी म्हटले का धडपडते माई
विकत असतेस काहीबाही
भीक मागण्यापरीस म्हणे ती
भाजी विकणे वाईट नाही..!


महेंद्र गौतम.

  • हे देखील वाचा
  1. घनगर्द तमातील मिणमिण.
  2. जिंदगी तुझको धुंडती है अभी.
  3. देह नाजूक साजूक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected