लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पहिला पाऊस : पहिली भेट.

पहिला पाऊस आठवतो का? 

पहिला पाऊस
पहिली मिठी पहिला किस आठवतो का?  

तुला आपला पहिला पाऊस आठवतो का? 

एक अडवळणाची वाट होती कॉलेजची. 

वाट बघत थांबायचीस तो क्रॉस आठवतो का?

 लालजर्द पेरू सारखं ओठांवरच गोड हसू..

आसपास असल्याचा गर्द आभास आठवतो का? 

व्हॅलेंटाईनच एक गुलाब कॉल्ड कॉफी विथ हॉट ब्राउनी.

 पिझ्झाच्या टॉपिंग वरला तो सॉस आठवतो का? 

अवेळीच बहरलेल्या चंद्रमधुर अधीर रात्री..

 रोम रोम रोमांचित अन् मोगरा श्वास आठवतो का? 

होऊ नये होतात वाद सुटू नयेत पण सुटतात हात..

अधुरल्या स्वप्नाचा एक अधुरा प्रवास आठवतो का? 

तुला आपला पहिला पाऊस आठवतो का ???

 ११ नोव्हेंबर.. 

                                            - महेंद्र गौतम 


  • हे देखील वाचा ✅

  1. एव्हढं करशील माझ्यासाठी???
  2. जराशी सांज ढळतांना..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected